![](images/activity/1.png)
सामुहिक तंत्रनिकेतन (CDTP) या केंद्र शासनाच्या योजनेचे जानेवारी 2020 पासुन तंत्रनिकेतनात पुणर्जिवीकरण करण्यात आले असुन या अंतर्गत अर्धापुर, मुदखेड, पासदगाव व नांदेड येथ महिलांकरिता व बेरोजगारांकरिता स्वंयरोजगार प्रशिक्षण वर्ग सुरु करण्यात आहे आहेत.
![](images/activity/2.png)
• प्रत्येक शैक्षणिक वर्षात तंत्रनिकेतनातील विद्यार्थ्यांकरिता विद्यालयस्तरावर विविध क्रिडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. यामध्ये क्रिकेट, व्हालीबॉल, कब्बड्डी या मैदानी खेळाबरोबरच बुध्दीबळ, कॅरमसारख्या बैठयास्पर्धांचा देखील समावेष करण्यात येतो.
• शैक्षणिक वर्ष 2021-22 दरम्यान कै. शंकररावजी चव्हाण जन्मषताब्दी वर्षानिमीत्य श्री शारदा भवन शिक्षण संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कर्मचा-या करिताच्या अंतर महाविद्वालयीन क्रिकेट स्पर्धेत तंत्रनिकेतनातील कर्मचा-यांनी हिरारीने सहभाग नोंदवीला.
![](images/activity/3.png)
• तंत्रनिकेतनातील विद्यार्थ्यांकरिता त्या त्यावर्षी वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचा समावेष करण्यात आला.
• कै. शंकररावजी चव्हाण जन्मशताब्धी वर्षनिमित्य आयोजित “जलदिंडी” या समाजिक उपक्रमा अंतर्गत काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीत तंत्रनिकेतनातील कर्मचारी व विद्यार्थ्यांनी हिरारीने सहभाग नोंदविला.
![](images/activity/4.png)
• यशवंत शब्द गौरव राज्यस्तरिय वकृत्व स्पर्धेच्या विभागीय फेरीमध्ये तंत्रनिकेतनातर्फे सहभागी कु. अलमास शेख या विद्यार्थीनिस विभागामधुन द्वितीय क्रमांक प्राप्त झाला.
![](images/activity/5.png)
• कै. कुसुमताई चव्हाण पुण्यतीथी निमित्य आयोजित ”कुसुमांजली“ या कार्यक्रमा अंतर्गत नांदेड जिल्यातील प्रसिदध् स्त्रिरोगतज्ञ डॉ गायत्री वाडेकर तसेच ईतर तज्ञ चिकित्सकांच्या उपस्थीतीत तंत्रनिकतनातील महिला कर्मचारी व विद्यार्थीनिंकरिता ”Don't hesitate: Let's talk“ या शीर्षक अंतर्गत परिसंवादाचे आयोजन करण्यात आले.
![](images/activity/6.png)
• रोटरी क्लब नांदेड शाखा व नांदेड फार्मसी कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने तंत्रनिकेतन परिसरात वृक्षारोपन व विद्यार्थ्यांकरिता आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले.
![](images/activity/7.png)
• मा. जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड व नांदेड फार्मसी कॉलेज यांच्या सयुक्त विद्यमाने तंत्रनिकेतनातील विद्यार्थ्यांकरिता मतदान जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले.
![](images/activity/8.png)
• आर्ट ऑफ लिव्हिंग शाखा नांदेड व नांदेड फार्मसी कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने तंत्रनिकेतनातील विद्यार्थ्याकरिता ”तनाव मुक्तीचा मुलमंत्र“ या शीर्षका अंतर्गत प्रबेाधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
• सत्य साई समिती शाखा नांदेड, यांच्या तर्फे दिग्रस नांदलाता. अर्धापुर येथे आयोतीत साप्ताहीक आरोग्य तपासणी शिबीरात फार्मसिस्ट म्हणुन तंत्रनिकेतनातील विद्यार्थ्यांनी सेवा बजावली.
• पाणी बचतीचे महत्व विद्यार्थ्यांना कळावे या करिता ”पाणीबचतःकाळाची गरज“ या शिर्षाका अंतर्गत प्रा. पौळ यांच्या मार्गदर्षनाखाली परिसंवादाचे आयोजन तंत्रनिकेतनात करण्यात आले.
![](images/activity/9.png)
• कै. शंकररावजी चव्हाण पुण्यतिथी निमीत्य ”वृक्षारोपन व दंत तापसणी शिबीराचे“ आयोजन तंत्रनिकेतनात करण्यात आले.
![](images/activity/10.png)
•मराठी राज्यभाषा दिनाचे औचित्य साधुन विद्यार्थ्यामध्ये मराठी भाषेची गोडी निर्माण व्हावी या अनुषंगाने तंत्रनिकेतनात मराठी राज्यभाषा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.